Saturday, 9 April 2011

एका तळ्यात होती (विडंबन)

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते अतिशहाणे पिल्लू तयात एक

घेताच कोणी त्याला खेळावयास संगे
सर्वाहुनी निराळे बळेच ते तरंगे

दावूनी बोट त्याला म्हणती खजिल लोक
आहे अतिशहाणे पिल्लू तळ्यात एक

पिल्लास माज भारी खुळे म्हणे सर्वांसी
पाखंड अविचारी सांगेल ते जनांसी

जो जो तयास टोची दावी उगाच धाक
होते अतिशहाणे पिल्लू तळ्यात एक

एके दिनी परंतु पिल्लास ना कळाले
ढापीव ज्ञान त्याचे डबक्यामध्ये बुडाले

घाणीत डुंबताना जन्मांतरी कित्येक
कधी न त्या कळाले तो मंडूकच एक